Top +30 बहिणी विषयी कविता,शायरी,चारोळ्या


बहिणी वर कविता In Marathi


नमस्कार मित्रांनो,

आज MarathiCharoli.in आपल्या साठी घेऊन आलेय आपल्या बहिणी साठी काही खास कविता ,शायरी आणि चारोळ्या ज्या तिला नक्कीच आवडतील असा मी शब्द देतो. बहीण भावाच नात म्हणजे एकदम टॉम आणि जेरी सारखच असत सतत भांडतात पण एकमेकांची काळजी पण करतात. हेच प्रेम व्यक्त करणाऱ्या काही कविता आम्ही शोदून आणल्या आहेत. 

या कविता आम्ही स्वतः लिहलेल्या नाहीत या आम्ही वेगवेगळ्या संकेत स्थळावरून वाचकांसाठी आणल्या आहेत. आमचा फक्त एवडाच हेतु आहे की वाचकांना चांगल काही मिळाव. जर आपल्याला काही सहकार्य करायच असेल आपल्या कविता, शायरी, चारोळ्या आम्हाला पथू सकता.



जर आपल्या भावाला किंवा बहिणीला रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दयायच्या असतील तर आम्ही घेऊन आलोय 

काही खास अश्या शुद्ध मराठी शुभेच्छा संग्रह पाहायला विसरू नका. 





बहिणीसाठी काही खास चारोळ्या 





बहीण असावी तर   

आमच्या दिदीसारखे   

नाहीतर जगात  

सिस्टरतर नर्सपण असते







माझ्या आयुष्यात सर्वकाही  

फक्त आहे माझी ताई  

भाव मनीचे सांगताना  

शब्द शब्द गुंफत जाई



🌺

आठवण येते का ? असं विचारायला कुणी

असावी वाटतं मिस करतो का रे मला ? 

असं बोलणारी कुणी असावी वाटतं 

मी किती ही इग्नोर केलं 

तरी ही नातं तसच जपणारी असावी 

वाटतं माझा प्रत्येक खोडीत 

मला सांभाळून घेणारी कुणी असावी 

वाटतं जिचा असण्याने वीट येई 

अन् नसण्यान जीव व्याकुळ होऊ 

असं वाटतं जिच्या विरहाने 

मनाला गहिवरून जावसं वाटतं , 

तशी एक धाग्याने बांधुन ठेवणारी

बहीण असावस वाटतं...





🌸

देव पूर्ण जगाची काळजी घेऊ शकत नाही , 

म्हणून त्याने प्रत्येक घरात आई दिली असावी ... 

त्याचप्रमाणे आई आपल्या जीवनाच्या प्रत्येक

 भागाची काळजी घेऊ शकत नाही ,

 म्हणून तिने आपल्याला बहीण दिली असावी ...


  

 


दादाची लाडकी , इवलीशी बाहुली ,

उंबरठा ओलांडताना , दादाच्याच पाया पडली .. 

संस्कारांची शिदोरी , अवघी ओटीत भरली ,

माहेरची साडी तिच्या , स्वाधीन केली ..





🥀🌹

छोटेसे बहिण - भाऊ ,

उद्याला मोठाले होऊ

उद्याच्या जगाला ,उद्याच्या युगाला 

नवीन आकार देऊ

ओसाड उजाड जागा , होतील सुंदर बागा

शेतांना मळ्यांना , फुलांना फळांना

नवीन बहार देऊ मोकळ्या आभाळी जाऊ , 

मोकळ्या गळ्याने गाऊ निर्मळ मनाने , 

आनंदभराने आनंद देऊ अन घेऊ प्रेमाने एकत्र राहू , 

नवीन जीवन पाहू , अनेक देशांचे , 

भाषांचे , वेशांचे अनेक

एकत्र होऊ कवी

 - वसंत बापट 





🌺🌺

ताई तुझ्या जाण्याने 

घर आता सुन्न सुन्न होईल 

या वेड्या भावाला 

तुझी आठवण मात्र 

सतत येईल




🌸🏵️

तसं तर या गोड नात्याबद्दल 

लिहिण्यासारखं खूप आहे 

आई दूध असेल बहीण 

त्याचं बनलेलं साजूक तूप 

आहे बहिण -महेश सटाले





तुला नकळत समजून काय समजायचं..

तुझ्यासारखी बहीण दिली म्हणून देवाला हात का नाही जोडायच..

तू प्रत्येकाला भेटू दे असं का म्हणायचं..

तू माझ्याजवळ आहे मग तुला मीच जपायच...

कारण मला आयुष्यात प्रत्येक क्षणाला तुझ्या सोबत राहायचं... #बहीण





🌷🥀

भावाचे जगणे करते कठीण 

तरीही पाठराखीन अशी ती 

बहीण प्रत्येक गोष्टीत तिला 

धाई उत्तम व्यवस्थापक माझी 

ताई भावाला लुबाडून राहते 

एकदम साधी दादागिरी करण्यात 

पटाईत दीदी जीवाला जीव 

देणारी लहान माई प्रेमळ 

मस्तीखोर अशी मुक्ताई





🌺🌸

बाबांची परी ती

अन् सावली जणू ती आईची ,

कधी प्रेमळ कधी रागीट

ही कविता आहे माझ्या ताईची .




🌷🌷

बहिणी साठी लढ तू तुला हरवू देणार नाही 

मी तुझ्या पाठीशी आहे तुझा पाठीराखा

 तुला संपवू देणार नाही मी .....





🌸🌸

कधी चूक होता माझी

ताई बाजू माझी घेते ,

गोड गोड शब्द बोलुन

शेवटी फटका पाठी देते .





🌷🌷

कितीही रागवलीस तरी 

माई हे बंध रेशमाचे तोडु 

नको , वेडा आहे गं 

तुझा भाऊ मला 

एकट्याला सोडु नको .




' ताई ' शब्दातचं आहे

माया प्रेमळ आईची ,

जन्मोजन्मी मज राहो

साथ माझ्या ह्या ताईची .





🥀🌹

माझी बहिण मलाच हवी,

पुढच्या सात जन्मात तीच हवी..

आवडत मला तीला त्रास देणं,

तिच्यापेक्षा मोठं असून शिव्या खाणं..

तिला त्रास देण्यात अलगच मजा असते,

ते सुख दुसऱ्या कोणत्याही गोष्टीत नसते..





🌹🌹

बहीण मायेचं साजूक तूप , 

आईचं दुसरे रूप । 

काळजी रुपी धाक , प्रेमळ तिची 

हाका कधी बचावाची ढाल , 

कधी मायेची उबदार शाल । 

ममतेच रान ओलेचिंब , 

पाण्यातले आपलेच प्रतिबिंब ।




🥀🌹

मला एक लहान अशी बहीण हवी होती....


माणूस म्हणून कसा आहे हे 

समजून घेऊन, बिनशर्त प्रेम

 करणारी एक ताई हवी होती,

वेळ पडली तर माझ्यासाठी 

सगळ्यांचा विरोधात झाली असती,

मला एक लहान अशी बहीण हवी होती....







माझी सगळी बडबड ऐकून 

घेणारी एक मैत्रीण हवी होती,

वेळ पडली तर गोष्टी समजावून 

सांगणारी हवी होती,

मला एक लहान अशी 

बहीण हवी होती....





🌹🌹

नावाने तर सगळेच बोलतात, 

दादा देखील कोणीही बोलेल,

पण लाडाने भाऊराया अशी 

हाक ऐकायची होती,

मला एक लहान अशी

 बहीण हवी होती....





🌺🌷

चॉकलेट घेऊन का होईना 

मैत्रिणीसोबत बोलायला मदत 

करणारी हवी होती,

आयुष्याचा संकटातून रक्षा 

तिची केली असती,

मला एक लहान अशी 

बहीण हवी होती....






🌷🌸🌸

रक्षाबंधनाच्या दिवशी

ओवाळते तुझ भाऊराया ,

आली वहिनी जरी

अशीच दे मझ माया...!😙





🌹🥀🥀🌺

प्रिय दीदी...

तुझं माझं नातं जरा खास आहे

कारण तुझं माझ्या 

जीवनात वेगळं स्थान आहे...





🌺🥀🌹

लहानपणी सगळ्यात जास्त 

भांडण झालं आपलं

म्हणूनच की काय सगळ्यात

जास्त प्रेम पण एकमेकांवर आहे आपलं...




🌺🌺

न सांगता तू माझ्या मनातले 

कॉन्फ्युजन ओळखते

जास्त लक्ष देऊ नकोस म्हणून 

कमी शब्दात छान समजवते..





🌸🥀

तू बनवलेली साधी कोशिंबीर 

पण टेस्टी असते

म्हणून तर तूच बनवलेली 

पाणीपुरी सगळ्यांना हवी असते...





🌺🌹

तू सासरी जातांना पहिल्यांदा 

माझ्या जवळ रडली

कधीच व्यक्त न केलेलं प्रेम 

त्या दिवशी करून गेलीस...






🌷🌼

अशीच आनंदी रहा, 

सुखात रहा हीच आहे इच्छा

वाढदिवसाच्या तुला " दीदी " 

खूप खूप शुभेच्छा..!






🥀🌹🌹

बहिण

।। मायेचं साजुक तुप

आईचं दुसरं रूप।।

।। काळजी रूपी धाक

प्रेमळ तिची हाक।।

।। कधी बचावाची ढाल

कधी मायेची उबदार शाल।।

।। ममतेचं रान ओलांचिंब

पाण्यातील आपलंच प्रतिबिंब।।

।। दुःखाच्या डोहावरील

आधाराचा सेतू।।

।। निरपेक्ष प्रेमामागे

ना कुठला हेतू।।

।।कधी मन धरणारी ,

तर कधी कान धरणारी.।।

।।कधी हक्काने रागवणारी,

तर कधी लाडाने जवळ घेणारी.।।

।।बहिणीचा रुसवा जणु,

खेळ उन-सावलीचा.।।

।।भरलेले डोळे पुसाया

आधार माय- माऊलीचा.।।

।।कुठल्याच नात्यात नसेल एवढी

या नात्यात ओढ आहे.।।

।।म्हणूनच बहिणीचं हे नातं

चिरंतन गोड आहे.।।

।।भरलेलं आभाळ रितं कराया

तिचीच ओंजळ पुढे येई .।।

।।जागा जननीची भरुन

काढण्या निर्मीली आईनंतर ताई.।।





🌺🌹🌹

आईसमान भासते मोठ्या बहिणीची माया,

वटवृक्षाप्रमाणे तिची निःस्वार्थ छाया,

न सांगताच जी घेते माझ्या मनाचा ठाव,

प्रसंगी माझ्या ओठी फक्त तिचेच नाव..!!


जिद्दीने हिम्मतीने गाठले तू यशाचे शिखर,

मावशी-काकांचे झाले स्वप्न साकार,

कुठे दूरदेशी जाऊन स्वप्न साकारते आहेस,

सर्वांच्या सुखासाठीच तर झटते आहेस..!!


कठीण समयी देतेस मला तू कायम साथ,

असावा माझ्या माथ्यावर तुझ्या आशिर्वादाचा हात,

सासर-माहेर कुटुंबाचा अतूट विश्वास तू,

आधार देण्या त्यांना जणू आधारवड तू..!!


दुःखाची सर कधी तुजपाशी न यावी,

प्रत्येक जन्मी तू मला

दीदी म्हणून हवी,

रहाविस तू खूप सुखी आणि

आनंदी हीच माझी इच्छा,


--वसुंधरा




🌹🥀🌸

आज सकाळपासूनच बहिण

आठवत होती एकसारखी

सहज पाहिले नभात संध्येच्या

रंगीत ढगांची बनलेली राखी.




बहीण न सांगताच मनातलं 

ओळखणारी अग काय झालंय 

सांग ना " प्रेमाने विचारणारी .. 

काहीही कारण नसताना भांडण 

करणारी रागाचे दोन शब्द 

ऐकवुन रडवणारी .. " पुरे झाले

तुझे नखरे आता " असं रागाने

म्हणणारी पुन्हा प्रेमाने जवळ

घेऊन समजवणारी .. 

बोलता बोलता मधेच आठवणींमध्ये

रमून जाणारी लग्नाचा विषय 

काढला की डोळ्यात पाणी आणणारी .. 

सासरी जाताना शेवटचं एकदा 

मिठी मारून रडणारी " नाही 

आता कुणी तुला ओरडणार " 

असं रडता रडता म्हणणारी .. 

प्रत्येकाच्या आयुष्यात अशी एकतरी

' बहीण ' असावी जीवापाड जपणारी 

न खुप खुप प्रेम करणारी .. 


-नंदिता पाटील



बहिणीसाठी बेस्ट शायरी संग्रह 



 ताई हे नुसतं नाव नाही त्याच्या आयुष्याच गाव आहे,

 आईनंतर तिच्यामुळे त्याच्या आयु्ष्याला भाव आहे





आईसमान भासते मज मोठ्या बहिणीची माया
वटवृक्षाप्रमाणे सतत देते ती मजवर तिची छाया
न सांगताच जी घेते माझ्या मनाचा ठाव
आयुष्यभर माझ्या ओठी माझ्या ताईचे नाव


तुम्ही पाठवलेल्या कविता.


बहीण मायेचं साजूक तूप,
आईचं दुसरे रूप |
काळजी रुपी धाक, 
प्रेमळ तिची हाक |
कधी बचावाची ढाल,
कधी मायेची उबदार शाल |
ममतेच रान ओलेचिंब
पाण्यातले आपलेच प्रतिबिंब |
बहीणीचं प्रेम हे 
अथांग समुद्रासारखं, 
निखळ असं नातं 
आयुष्यभर जपण्याचं, 
इथे असतो फक्त जिव्हाळा 
अन असतो अतूट विश्वास, 
बंधन नसतं कुठलं त्यात 
निर्मळ हास्याचं असतं खास, 
सोन्याहून सुंदर असं
 जगात आहे अनमोल, 
नातं असं हे आपुलकीचं 
भाऊ बहिणीच्या प्रेमाचं
❤️❤️❤️❤️

        - ADITYA  ZINAGE



 

 मायेचं साजूक तूप, आईचं दुसरं रूप
काळजी रूपी धाक, प्रेमळ तिची हाक
कधी बचावाची ढाल तर कधी मायेची उबदार शाल
भरलेलं आभाळ रितं कराया,
तिचीच ओंजळ पुढे येई,
जागा जननीची भरून काढाया देवाने निर्मिली आईनंतर ताई

-Aniket





अधिक वाचा. 



"Keyword"

"बहिणी विषयी शायरी"

"बहीण स्टेटस मराठी"

"मोठ्या बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा"

"भाऊ बहीण स्टेटस"

"Bahin bhau quotes in marathi"

"Bahin quotes in marathi"

"बहिणी वर कविता in marathi"

"Bahini vr Kavita in marathi"

 

1 टिप्पणी

टिप्पणी पोस्ट करा