❤️Marathi प्रेमावर kavita❤️
प्रेम..!
हे प्रेम म्हणजे तरी नेमक काय??
याचं उत्तर असं की एखाद्यावर आपल्या जीवा पेक्षा जास्त जीव लावण. ठेच येकाला लागली तरी दुःख दुसऱ्याला होणे.
प्रेम म्हणजे विश्वास....❤️
प्रेम म्हणजे काळजी....❤️
प्रेम म्हणजे दोन जीव येक प्राण..❤️
प्रेम हे येका विस्तवा सारखे असते जेवढं तुम्ही त्याला हवा द्याल ते अजूनच भडकत राहत... पकडण्याचा प्रयत्न केला तर भाजत देखील... आणि तसच सोडलं तर विझून ही जातं...
या मुळे प्रेमाला सारख भडकत ठेवण्यासाठी प्रेमाच्या आठवणी ज्वलंत ठेवण्यासाठी कविता खूप मदत करतात.
या साथी प्रेमींना मनमोहक अश्या कविता पुरविण्याचं काम marathicharoli.in ने हाती घेतले आहे...
या साठी आम्ही +२० चारोळ्या घेऊन आलोय..
#प्रेम चारोळ्या
#marathi prem charolya
#प्रेम कविता
चारोळ्या
चमकणाऱ्या काजव्यांना
रात्रीचा अंधार घालवता येत नाही
आणि त्या रात्रीला देखील
काजव्यांचा प्रकाश लपविता येत नाही
रातराणीचं आयुष्य म्हणतात
एका रात्रीचं असतं
एका रात्रीचं असल तरी
मोठ्या खात्रीचं असतं
इथे प्रत्येकाला वाटते
आपण किती शहाणे
यावर उपाय एकच
सर्व शांतपणे पाहणे
इथे प्रत्येकाला
प्रत्येकाचा भूतकाळ आहे
मला जगानं खूप छळलं
हा प्रत्येकाचा आळ आहे
जमिनच हरवली तर
मुळांनी कुंज्यायाच ?
ज्यांचा जीवावर फुलायचं
ते पाणी कोठून आणायचं
जमिनीतले पाणी मिळते
मूळ तेव्हा रुजते
निष्पर्ण झाडावर प्रेम बसरते
तेव्हा त्यालाही पालवी फुटते
🍁🍁🍁🍁🍁
कुणीतरी आपल्यासाठी.....
का कुणास ठाऊक प्रत्येकाला वाटते
कुणीतरी आपल्यासाठी असावे
ज्याच्यावर आपण थोडेफार रुसावे
आपल्या डोळ्यातील अश्रु एकदा तरी त्यानेच पुसावे
रागवता आपण, त्याने आपल्याला समजवावे
मनातील व्यथांना त्याच्याच जवळ मोकळे करावे
उशिर झाला केव्हा तर लटके लटके रुसावे
पण वाट पहात आपली त्याने तिथेच असावे
केव्हा नटता सावरता आपण
त्याने मनापासुन कौतुक करावे
का कुणास ठाऊक प्रत्येकालाच वाटते..
कुणीतरी आपल्यासाठी असावे...
...नागेश पाटील
🍁🍁🍁🍁🍁
प्रेमाचा अर्थ
सकाळी डोळे उघडण्य पूर्वी जिचा
चेहरा पाहण्याची इच्छा होते ....ते प्रेम आहे
मंदिरा मध्ये दर्शन करताना जी
जवळ असल्याचा भास होतो ...ते प्रेम आहे
भांडून सुधा जिचा राग येत नाही.. ते प्रेम आहे
जिच्या कुशीत डोके ठेवल्यावर पूर्ण
दिवसाचा थकवा दूर झाल्यासारखे वाटते... ते प्रेम आहे
जिच्या कुशीत डोके ठेवल्यावर मन
मोकळे झाल्यासारखे वाटते...ते प्रेम आहे
स्वताला कितीही त्रास झाला तरीही
जिच्यासाठी ख़ुशी मागता .....ते प्रेम आहे
जिला लाख विसरण्याचा प्रयत्न
करा विसरता येत नाही.... ते प्रेम आहे
कुटुंबाच्या फोटो मध्ये आई बाबाच्या सोबत
जिचा फोटो असावा असे आपल्याला वाटते.. ते प्रेम आहे
जिच्या चुकीना रागावतो आणि
नंतर एकांतात हसू येते ....ते प्रेम आहे
हि पोस्ट वाचताना प्रत्येक
ओळीला जिची आठवण आली... ते प्रेम आहे.
*****************************
#चार ओळी
टिप्पणी पोस्ट करा
टिप्पणी पोस्ट करा