+21 जीवनावर आधारित मराठी कविता संग्रह | Marathi Charolya on life.


#2021 मराठी जीवनावर कविता...


नमस्कार मित्रहो,

आज मी घेऊन आलोय काही निवडक अश्या मराठी चारोळी संग्रह जो की तुम्हाला नक्की आवडेल. या सर्व कविता चारोळ्या माझ्या नाहीत किवा मी लिहल्या नाहीत. 

या सर्व कविता मी वाचकांपर्यंत पोहचाव्या या हेतु ने लिहत आहे आणि शक्य त्या लेखकाचे नाव त्यांच्या कवितेवर लिहळे आहे. 

जर आपण इथे मराठी चारोळी आयुष्य किवा आयुष्यावर कविता किवा चारोळ्या वाचनासाठी आला असाल तर आपल्याला खंत वाटणार नाही अश्या मराठी जीवनावर कविता मी शोधल्यात. 

त्यान मध्ये काही कोरोना वर देखील कविता आहे. 

तुम्ही जर निवडक कविता, चारोळ्या शोधत असाल जसं की

Marathi charolya on love, Marathi charolya on life, Shivaji Maharaj Charoli ,Shivaji Maharaj shivjyanti special msg.






मराठी चारोळी 


Bootstrap Example

Best Marathi Charoli,Kavita

उत्तम मराठी चारोळी कविता

फस्त केली दुःखे 

सारी मी ताटातली 

नशीब पुन्हा पुन्हा 

का बाढून जाते

मी मांडली

 कुंडली डोळसपणे

 आयुष्य अंधपणे

फाडून जाते

🍁🍁🍁




 

माणसाने फक्त 

इतकं शहाणं असावं

त्याला मूर्ख म्हणल की 

शिवी वाटावी...

🍁🍁🍁



 

आकाशातले द्योंगावणारे विमान

 आणि त्यामागुन विरत चाललेल्या 

 धुरामध्ये हरवलेलं बालपण आठवत राहतं

उंचावूनी हात मारलेली हाक

 हरवलेल्या ढगात हरवलेल्या झाडांत

 काटलेला माग डोळ्यांत साठवत राहतं

मोठे होत गेलो कक्षा रुंदावत गेल्या

 क्षितीजे धुंडाळले स्वप्ने गुंडाळले

 तरी

बालपणीच विमान 

गाठत राहतं

🍁🍁🍁


मराठी चारोळ्या 

 

साऱ्या जगाने अश्रू ढाळले होते 

आमच्या जवळी आम्ही ढाळताना

 कोणी नव्हते आमच्या जवळी

दुःख

हे आमचे माणूसघाणे

 नसे आवडे गर्दी त्यास पाहुनी एकांत 

बिलगण्यास येते आमच्या जवळी

इतके मी

 व्हावे आश्वस्त 

या मार्गस्थ जीवनी

 संयम असा यावा 

अंगी जसा 

संधीच्या शोधात

बोका ध्यानस्थ..

🍁🍁🍁


 #Marathi charolya 

 

मन हलक असावं

पण हलकट नको

सर्यातूनी निसटता यावं

पण तेलकट नको

मन माती सारखं असावं

पण मातकट नको

मन खट्याळ असावं

पण वात्रट नको..

🍁🍁🍁



 

हेंड सम

शक्ल के पीछे 

बहोतसे हादसे

छिपे होते है

🍁🍁🍁


 

मंद उजेडास पाहुनी आभाळभर पाजळतो

 तिळाला पाहुनी हल्ली

काळोख जळतो

स्वतःच्या त्रिज्या लक्षात आल्या त्याला

 नाचता आलं नाही की अंगण सोडून पळतो

🍁🍁🍁

 

#Marathi charolya on life

 

इच्छांचा पिच्छा सोडिला

आयुष्य तेव्हा कळले.

दिवसाचे हास्य पसरले जेव्हा

डोळ्याचे ओझे रात्रीतुनि ढळले...

🍁🍁🍁


 

अकड तो मेरे 

फितरत में नही है

 झुकना तो मेरे लिए

 मुश्किल नहीं हैं

 फिर भी अड़े रहते है 

कुछ उसूल तसव्वुफ पर 

बड़ी अजीब सी हैं 

गुरुर को मरोड़ के खाने में

🍁🍁🍁



 

जीभेला

सांभाळायला

शिका, 

तिचा तोल 

गेला की माणसं 

गमवण्याची 

वेळ येऊ 

शकते.

🍁🍁🍁


जीवनावर मराठी कविता

 

विश्वास ठेवा, आपण जेव्हा 

कोणासाठी काही चांगल करत

 असतो, तेव्हा आपल्यासाठी सुद्धा  

कुठेतरी काही चांगल घडत असत. 

इतकंच की ते आपल्याला आता

दिसत नसत.

🍁🍁🍁



 

ऐकलेलं

जमीन जुमला सारा इथेच राहतो

फक्त नाव आणिक भाव बदलतो

 

ऐश्वर्य न् सुख सारे क्षणिक येथले

उगीच रे माणसा तू त्यातच गुंततो

 

जरूरी पुरतेच धनधान्य जमवावे

ऐकलेलं सारं कधी संतांचं मांडतो

 

नश्वर देह मोह माया पोकळ सारी

मुक्त हाताने शेवटास जो तो जातो

 

येणे जाणे कधी ना कळले कोणा

सांग 'शिवा' का कोण ठाम वदतो

 

©शिवाजी सांगळे

🍁🍁🍁

 


best charoli in marathi

 

जन्माला आलास,मुठी वळून आलास

     आयुष्यभर त्यात काही साठवत राहिलास

     पण अंती काहीही नव्हते भरले त्यात,

     जाताना तू रिक्त हस्तानेच गेलास.

 

     हे माझे, ते माझे, सारेच माझे

     हयात घालवलीस करण्यात सारे तुझे

     पण भोपळा फुटला होता भ्रमाचा,

     फुका माया-मोहात गुंतून राहण्याचा.

   

     काही नाही घेऊन तू जाणार

     सारे सारे काही येथेच रहाणार

     फक्त तुझे सद्-वर्तनाचेच नाव होणार,

     तुझ्या पाठी जग तुझे नाव घेणार.

 

-----श्री अतुल एस परब

🍁🍁🍁




 

लक्तरे हृदयाची जाळले त्यांनीच होते

अत्तरे हृदयाची लावले त्यांनीच होते

 

हा देह झिजून गेला संसार जोडण्यात

सुख कमवून सारे टाळले त्यांनीच होते

 

किती माघार घेऊ ही सांग देवा तू तरी

वफदार कुत्र म्हणून पाळले त्यांनीच होते

 

एक एक थेंब घामाचा न्याय मागत आहे

या कष्टकरी देहाला साळले त्यांनीच होते

 

आता सहानभूती नको मोकळी द्या ओ थोडी

जिवंत असून रक्तातून वगळले त्यांनीच होते

 

कविराज...अमोल....

🍁🍁🍁


#एकांत मराठी चारोळी

 

"प्रत्येक क्षण जगून घे !"

   

प्रत्येक क्षण जगून घे

प्रत्येक क्षण पाहून घे

उद्याचे कुणी काय सांगता,

आठवणीच राहातील वळून पहाता.

 

     सुख-दुःखाचे आहे काटयांनी भरलेले

     खडतर जीवनही सहून घे

     जीवनाचे आहेत रंग-ढंग न्यारे,

     आनंदाचे उमाळे, दुःखाचे सुस्कारे.

 

क्षणभंगुर जीवनाचा हा दंव-बिंदू

अळवावरच्या पानावरील गतिमान जल-बिंदू

पहाता-पहाता जाईल विरून,

जाईल तुज जगही विसरून.

 

     मृत्यूवर नियंत्रण नाही तुझे

     हक्क त्याचाच हिरावून घेण्याचे

     जोवर आहे, जगून घे,

     सुंदर फुलासम फुलून घे.

 

ईश्वराच्या हातातले बाहुले आपण

सोडून दे अहंभाव, मी-पण

सत्कर्म काहीतरी करून घे,

वर्म हेच जाणून घे.

 

     लाटांसम सागराच्या अपुले जीवन

     एक फुटता, दुसरीस नवं-जीवन

     लाटांच्या आनंद-लहरींवर तरंगून घे,

     प्रत्येक क्षण जगून घे.

 

वाट्यास सुखांपेक्षा दुःखेच जास्त

जाहली जरी स्वप्ने उद्ध्वस्त

दुःखातही सुखास पाहून घे,

प्रत्येक क्षण जगून घे.

 

     ज्या विध्याताने दिले जीवन

     ऋण या जन्मीच फिटू-दे

     त्या ईश्वराचे पावन नाम,

     हरक्षणी मुखी राहू दे.

 

-----श्री अतुल एस परब(अतुल कवीराजे)

🍁🍁🍁


#jivanavar kavita marathi

 

"पहा खेळताना वेळ ,खेळा बुद्धिबळाचा खेळ !"

        ---------------------------------------------

बुद्धिबळाचा खेळ, जणू बुद्धीचाच खेळ

पटावरल्या ६४ घरांचा नेहमीच असतो मेळ

एकमेका धरून ती जोडलेली असतात,

कृष्ण-धवलांच्या साखळीत गुंफली जातात.

 

या ३२ घरातून, समोरील ३२ घरात मुक्त

प्यादी इथून, तिथे सरकत असतात

फौजफाटा घेऊन राजे  पटावरले,

शह-मातेस सरसावलेले असतात.

 

या बुद्धिमान खेळाच्या दोऱ्या असती 

त्या बुद्धिमान चतुर माणसा हाती

पटावरील  कळसूत्री बाहुल्याना मनाप्रमाणे,

ते पुढे मागे कसे सरकविती.

 

प्रतिस्पर्ध्याचा डाव घेऊन लक्षात

आधीच खेळी खेळली जाते

समोरच्या हालचालींवर ठेवून नजर,

पटावरली प्यादी हलवली जाते.

 

पण या बुद्धिमान खेळासही कधी

वेळेच्या बंधनात बांधले जाते

स्पर्धा परीक्षा बुद्धिबळाच्या घेताना,

हि वेळच मुख्यत्त्वे पाळली जाते.

 

खेळी खेळताना पटावरील बुद्धिबळाच्या

दोन्ही डोकी विचार करीत असतात

सोबत बाजूकडील वेळेच्या घड्याळाचेही,

ते तेव्हढेच भान ठेवीत असतात.

 

वेळेची मर्यादा पाळावीच लागते

जीवनातही ती काटेकोर असते

तास काटा, सेकंड काट्यांबरोबरच त्याच्या,

आपले जीवनही धावत असते.

 

नियमानुसार बुद्धिबळाच्या लागू होते

खेळाडूंना वेळेचे बंधन पाळावे लागते

अमुक वेळेत पुढली तमुक खेळी,

हि त्यांना खेळावीच लागते.

 

विचारांच्या गतीपुढेही जाऊन वेगाने

त्यांचे हातही चालत असतात

भराभर प्रतिस्पर्ध्याच्या शह - मात देत,

ते लढाई जिंकण्याच्या तयारीत असतात.

 

घड्याळ म्हणते, थांबू  नका, खेळत राहा

माझी मर्यादा पाळत राहा

जिंकण्याची आस मनी ठेवून,

तुम्ही सतत पळत राहा.

 

माझ्या गतीने जो धावेल

तोच जीवनाची स्पर्धा जिंकेल

पळता पळता जो थांबेल,

तो या खेळाची बाजी हरेल.

 

जीवनाच्या या बुद्धिपटांत आपण

अथक खेळी खेळत असतो

वेळेचेही नियमित भान राखून,

स्व-कौशल्याने ती जिंकत असतो.

 

-----श्री अतुल एस परब(अतुल कवीराजे)

🍁🍁🍁



 

                      "ओंडक्यासही या फुटलाय धुमारा"

                     

माजवला चक्री-वादळाने पुरता हाहाकार

भुईसपाट झाली होती झाडे समूळ

उखडून मातीतून आली वर कलेवरे,

वृक्ष आजानूबाहू पडलेत उन्मळून.

 

दणका देत पुनरपि चक्राकार

वावटळी फिरत्या गिरक्यांनी गोलाकार

पडझड होत होत आयुष्याची,

चिंता होती मानवास उद्याची.

 

शमली, मालवली वादळ-ज्योत केव्हातरी

नुकसान भरपाई ही कोण करी ?

अशी कितीतरी संकटे येति सामोरी,

हतबुद्ध मानव करी मनाची तयारी.

 

ओंडक्या-ओंडक्यांनी कोसळती वृक्ष

भयाण रान जणू वाळवंट रुक्ष

कित्येक पिढ्यानी होती पाहिली,

माणसाच्या ती होती सेवेस वाहिली.

 

जिवंतपणी फुलवीत होते ते मळा

मरणा-नंतरही सहत  होते कळा

उद्ध्वस्त होऊनही करीत जीवन अर्पण,

देत होते मानवास जळणास सरपण.

 

तो ओंडका पडून होता एकला

नजरेस कुणाच्या नाही तो पडला

दुर्लक्षित असा भिजत पावसात,

होता राहिला तसाच कित्येक दिवसांत.

 

कुणा एकाचे त्याजकडे लक्ष्य गेले 

काहीतरी त्यास नवल आढळले

खितपत पडलेल्या त्या सुक्या ओंडक्यास,

फुटला होता इवलुसा धुमारा.

 

त्या ओंडक्याने जीव धरला होता

पुन्हा तो उभारू पाहात होता

फिनिक्स पक्ष्यासम राखेतून उठून,

पुन्हा जीवन जगू पहात होता.

 

चमत्कार निसर्गाचा, याची देही याची डोळा

आम्हा समोर दिसत होता

ओंडक्यास त्या कोंब फुटून,

लहानगा जीव फुलत होता.

 

पुनर्जीवनाचे ते लक्षण होते

मरणावरती मात करीत होते

उन्मळून पडताही वृक्ष फांदीने,

पुन्हा एका वृक्षास घडविले होते.

 

-----श्री अतुल एस परब(अतुल कवीराजे)

🍁🍁🍁




 

रडवु नको मला

हे जीवना आता

शांत करायला

आता कुणीच नाहीये...

🍁🍁🍁




 

"गरुडासारखे उंच उडायचं असेल तर 

कावळ्यांची संगत सोडावी लागते."

🍁🍁🍁



 

"गेलेल्या क्षणांसाठी झुरत बसण्यापेक्षा

समोर आलेलं आयुष्य भरभरुन जगा...!"

🍁🍁🍁



 

  जीवनावर आधारित कविता

 

                       " हीच  तर  जगण्याची  जिद्द "

                       --------------------------

पहाटेस फिरता फिरता

अवचित नजर पडली

सलाम तुला हे फुला,

तुझी जगण्याची जिद्द मी पहिली.

 

नाही स्थल नाही जल

सारीकडे पाषाण अन धूल

परी फुलणारे तुझे जीवन,

मला काहीतरी सांगून गेले.

 

उद्याची काय बात करावी

आजचे जीवन जगून घ्यावे

पण तुझे हे जगण्याचे गाणे,

मला जीवन तराणे शिकवून गेले.

 

     मित्रानो, पुन्हा एकवार या फुलास माझा सलाम, त्याने जगण्याची, फुलण्याची जिद्द दाखवली, या कठीण अन बिकट परिस्थितीतही.

-----श्री अतुल एस परब(अतुल कवीराजे)

🍁🍁🍁



 

आपली माणसं*

 

परमेश्वरा का नात्याच्या बंधनात विणली आपली माणसं

तो आहे देवळात बंद पण परकी वागली आपली माणसं

 

किती पैसा कमवणार तुम्ही तुम्हाला देव मानलं म्हणून

महाग चष्मा चढवल्यावर परकी वाटली आपली माणसं

 

ज्यांना देव समजून किती विश्वास ठेवता येड्या हो तुम्ही

त्यांनीच शेवटी पैशासाठी मारून टाकली आपली माणसं

 

जाऊद्या जेव्हड लुबाडायचं तेव्हडं लुबाडून घेतलं तुम्ही

पैशापायी आज स्मशान रांगेत अडकली आपली माणसं

 

श्वास गुदमरला होता शब्द ही सारे शेवटी संपले होते

आज पाहिलं माणुसकी वाचून विटली आपली माणसं

 

खोटा मुखवटा चढवून येतात काही माणूस गेल्यावर इथं

मदत मागितली तर खोट्यापणानं रडली आपली माणसं

 

भरदार झालेलं झाडं अस निखळून जाईल वाटलं नव्हतं

कसा काळजचा ठोका चुकवून सोडून चालली आपली माणसं

 

*कोरोना काळात स्वतःबरोबर घडलेला प्रकार*

*शब्दात मांडला यात कोणाला दुखवायचा हेतू नाही*

 

*कविराज.अमोल ..अहमदनगर

🍁🍁🍁

1 टिप्पणी

टिप्पणी पोस्ट करा